
मुंबई ः मंगलोर येथे झालेल्या ऑल इंडिया गोल्डन मास्टर बॅडमिंटन स्पर्धेत विनोद धारप (ठाणे) आणि आनंद घाटे (पुणे) यांनी दुहेरीत विजेतेपद पटकावले.
मंगलोर येथील मंगला स्टेडियमवर ऑल इंडिया गोल्डन मास्टर बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विनोद धारप (ठाणे) व आनंद घाटे (पुणे) यांनी ७५ प्लस गटात दुहेरीमध्ये विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत त्यांनी उपांत्य फेरीत सुरेश हेगडे व विश्वेश्वर यांचा पराभव केला. मंगलोर येथील आयकर अधिकारी परिमल यांच्या हस्ते विनोद धारप व आनंद घाटे यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.