करुण नायरचे शानदार द्विशतक; भारत अ सर्वबाद ५५७

  • By admin
  • May 31, 2025
  • 0
  • 27 Views
Spread the love

कँटरबरी ः पहिल्या अनधिकृत कसोटीत मधल्या फळीतील फलंदाज करुण नायर याने शानदार द्विशतक ठोकले. नायरच्या चमकदार फलंदाजीने भारतीय अ संघाने इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध पहिल्या डावात ५५७ धावा केल्या.

या सामन्यात इंग्लंड लायन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु करुण, जुरेल आणि सरफराज यांनी शानदार फलंदाजी केली आणि भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. सात वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या करुण नायरने जोरदार फलंदाजी केली.

इंडिया अ संघाकडून खेळणाऱ्या करुण नायरने इंग्लंड लायन्सविरुद्ध २७२ चेंडूत द्विशतक पूर्ण केले. २८१ चेंडूत त्याने २०४ धावा काढल्या. अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंडिया अ संघाने १२५.१ षटकात सर्वबाद ५५७ धावसंख्या उभारली. करुणने द्विशतक पूर्ण केले असताना, ध्रुव जुरेल याचे शतक हुकले. जुरेल १२० चेंडूत ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ९४ धावा करून बाद झाला. जुरेल आणि करुण यांच्यात चौथ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी झाली. अजित डेल याने ही भागीदारी मोडली. नितीशकुमार रेड्डी प्रभावित करू शकला नाही आणि सात धावा काढून बाद झाला. दरम्यान, शार्दुल ठाकूर २७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हर्ष दुबे (३२), अंशुल कंबोज (२३), हर्षित राणा (१६) या तळाच्या फलंदाजांनी आपले योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *