सोलापूर येथे सोमवारी अंडर १५ बुद्धिबळ स्पर्धा

  • By admin
  • June 1, 2025
  • 0
  • 9 Views
Spread the love

सोलापूर ः सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने सोलापूर चेस अकॅडमीतर्फे सोमवारी (२ जून) सकाळी १० वाजता सात रस्ता येथील उपलप मंगल कार्यालय १५ वर्षांखालील जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे.

ही बुद्धिबळ स्पर्धा जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या स्विस लीग नियमानुसार खेळाडूंच्या संख्येनुसार ५ ते ८ फेऱ्यात संपन्न होणार आहे. खेळाडूंना प्रत्येकी १० मिनिटे व प्रत्येक चालीला ५ सेकंद वाढीव वेळ देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सोलापुर जिल्ह्यातील १ जानेवारी २०१० रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले खेळाडू सहभाग घेऊ शकतात. प्रथम येणाऱ्या चार मुले व मुलींची निवड छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक खेळाडूंना १ हजार रुपये, मेडल व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेत १० व ७ वर्षांखालील खेळाडूंना देखील प्रत्येक गटात ५ बक्षिसे ठेवण्यात आलेली असून विजेत्या खेळाडूंना एकूण ४० बक्षिसासह १५ हजारपर्यंतची रोख बक्षिसे, चषक व मेडल्स देऊन गौरविण्यात येणार आहे. इच्छुक खेळाडूंनी अधिक माहितीसाठी उदय वगरे (८८८८०४५३४४) अथवा प्रशांत पिसे (९१५६८१५९६३) यांच्याकडे संपर्क साधावा असे संस्थेचे सोलापूर चेस अकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, सचिव सुमुख गायकवाड यांनी कळविले आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सोलापूर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *