जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे राष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा गौरव

  • By admin
  • June 1, 2025
  • 0
  • 59 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या वतीने तलवारबाजी, सॉफ्टबॉल, बेसबॉल या खेळात खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्वल केले आहे. अशा खेळाडूंच्या मातांचा गौरव शिवछत्रपती महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.

फुलंब्री मतदार संघाच्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या हस्ते खेळाडूंच्या मातांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य फुलचंद सलामपुरे, ए बी स्कूलचे संचालक भाऊसाहेब काळे, राज्य संघटनेचे सरचिटणीस डॉ उदय डोंगरे, सचिव डॉ दिनेश वंजारे, माजी राष्ट्रीय खेळाडू स्वप्निल शेळके, आकाश आरमाळ, सागर मगरे, अजय त्रिभुवन, क्रीडा शिक्षक बाजीराव भुतेकर, राकेश खैरनार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सेवानिवृत्तीबद्दल डॉ बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच ज्येष्ठ क्रीडा संघटक डॉ फुलचंद सलामपुरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे तलवारबाजी खेळात शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित कशिश भराड हिचा देखील याप्रसंगी संघटनेचे वतीने सत्कार करण्यात आला.

डॉ उदय डोंगरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी तलवारबाजी खेळाचे यशस्वी वाटचाल विशद करत छत्रपती संभाजीनगर हे तलवारबाजी खेळातील भारतामधील प्रमुख केंद्र असल्याचे नमूद केले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण ४६ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी केली असून महाराष्ट्र शासनाने ९ खेळाडूंना व १ क्रीडा मार्गदर्शक यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले आहेत. येत्या काळात निश्चितच छत्रपती संभाजीनगरचे खेळाडू आशियाई व ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील असा उदय डोंगरे यांनी विश्वास व्यक्त केला.

आमदार अनुराधाताई चव्हाण यांनी तलवारबाजी या ऑलिम्पिक क्रीडा प्रकाराची छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंचे व छत्रपती संभाजीनगर जिल्हा तलवारबाजी संघटनेचे कार्य बघून भविष्यात नक्की ऑलिम्पिक पर्यंत तलवारबाजीचे खेळाडू जातील असा विश्वास व्यक्त केला व यासाठी खेळाडू व संघटनेला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आमदार अनुराधाताई चव्हाण यांनी नमूद केले. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या खेळाडूंच्या मातांचा सत्कार छत्रपती संभाजीनगर जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या वतीने केला जातो याविषयी कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सुनील वायसाळ व प्रा सागर मगरे यांनी केले. डॉ दिनेश वंजारे यांनी आभार मानले.

सत्कारमूर्ती

या कार्यक्रमात खेळाडू मातांचा गौरव करण्यात आला. त्यात पुष्पा वाघ, कविता लोहिया, अंजली भराड, दीपाली पाटील, अश्विनी जाधव, रचना शहा, उज्वला बिराजदार, सविता गोटे, स्वप्ना डोंगरे, मोहिनी राऊत, सविता भामरे, सुनंदा जाधव,
रोहिणी वंजारे, सीमा जाधव, साधना पाटील, कल्पना क्षीरसागर, ज्योती हुळसुरकर, मनीषा वंजारे, आशा झोंड, जयश्री थोरात, मनीषा वानखेडे, अनिता अवचार, सारिका वाघमारे, रेणुका कुलकर्णी, जयश्री जाधव, प्रतिभा वाहूळ, अर्चना ढसाळ, संगीता बोर्डे, शीतल आव्हाड, वैशाली वनारसे, संगीता जाधव, मुक्ता डोंगरे, प्रमिला राठोड, दीपाली ढवळे, वैशाली नलावडे, विजया मोईम, योगिता अंभोरे, सुनंदा जाधव, नीता आहेवाड, लताबाई जाधव, विद्या शिंदे, मायावती लक्कस, वंदना नवघरे, निर्मला गुडेकर, रेणुका बोरकर, अनुराधा सहाने, कल्पना धोंडफळे, भाग्यश्री भिसे, अनिता काळे, ज्योति छल्लाणी, रेखा सोनवणे, शारदा सोनवणे, रीता पडोळसे, सुनीता गुंडेकर, चंद्रकला पिंपरे, नीता जाधव, राजेश्री डोंगरे, शितल वाघ
आदींचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *