
सोलापूर : ताश्कंद, उझबेकीस्तान येथे झालेल्या एशियन कराटे फेडरेशनच्या २१ सीनिअर व पॅरा एशियन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत सोलापूरच्या भुवनेश्वरी जाधव हिने वैयक्तिक कुमिते प्रकारात कास्य पदक जिंकून देशाच्या अधिकृत कराटे इतिहासात प्रथमच पदक खेचून आणले.
त्यानिमित्त शनिवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते भुवनेश्वरीचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, कुलगुरू डॉ प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ अतुल लकडे आदी उपस्थित होते.