जो रुटचे विक्रमी धमाकेदार शतक, इंग्लंडचा दमदार विजय 

  • By admin
  • June 2, 2025
  • 0
  • 33 Views
Spread the love

कार्डिफ : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जो रुटच्या दमदार शतकाच्या बळावर इंग्लंड संघाने वेस्ट इंडिज संघाचा तीन विकेट राखून पराभव केला. शतकी खेळी करताना जो रुट याने शिखर धवन व ब्रायन लारा यांना मागे टाकले आहे. या  सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना ३०८ धावसंख्या उभारली. रुटच्या धमाकेदार शतकाने इंग्लंडने सात बाद ३१२ धावा फटकावत तीन विकेटने सामना जिंकला.

जो रूट खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. कसोटी असो किंवा एकदिवसीय, प्रत्येक स्वरूपात त्याच्या बॅटमधून भरपूर धावा येत आहेत. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत धावांचा पाऊस पाडला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले. आता दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने दमदार शतक झळकावले आहे आणि वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना धुडकावून लावले आहे. त्याच्यासमोर विरोधी गोलंदाज असहाय्य होते. शतक झळकावून त्याने शिखर धवन आणि ब्रायन लारा यांना मागे टाकले आहे.

एकदिवसीय क्रिकेटमधील १८ वे शतक
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ९८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. रुट यानै १३९ चेंडूत नाबाद १६६ धावा काढल्या आहेत. त्यात त्याने २१ चौकार व २ षटकार मारले.  त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १८ वे शतक झळकावले आहे आणि यासह त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत शिखर धवन, आरोन फिंच, शाई होप, डेसमंड हेन्स आणि जॅक कॅलिस यांना मागे टाकले आहे. या पाच फलंदाजांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी १७ शतके झळकावली होती. माजी भारतीय फलंदाज धवनच्या नावावर १७ एकदिवसीय शतके आहेत.

ब्रायन लाराला मागे टाकले
जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये ३६ आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८ शतके केली आहेत. अशाप्रकारे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या एकूण शतकांची संख्या ५४ झाली आहे. आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत ब्रायन लाराला मागे टाकले आहे. लाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ५३ शतके केली होती.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७००० धावा पूर्ण 
जो रूटने या सामन्यात ८४ धावा करून एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७००० धावा पूर्ण केल्या आहेत. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी ७००० धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज आहे. त्याच्या आधी इंग्लंडसाठी एकदिवसीय सामन्यात कोणत्याही खेळाडूला इतक्या धावा करता आल्या नव्हत्या. रूटने आतापर्यंत १७९ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ७०६८ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने १८ शतके आणि ४२ अर्धशतके झळकावली आहेत.

सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

सचिन तेंडुलकर – १००
विराट कोहली – ८२
रिकी पॉन्टिंग – ७१
कुमार संगकारा – ६३
जॅक कॅलिस – ६२
हासिल अमला – ५५
जो रूट – ५४
महेला जयवर्धने – ५४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *