
सोलापूर ः राज्य शालेय फुटबॉल टेनिस स्पर्धेत एम ए पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्षांखालील मुलांनी दोन सुवर्ण व तीन रौप्य अशी पाच पदकांची कमाई केली आणि विजेतेपद पटकाविले.
सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सोलापूर जिल्हा फुटबॉल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा राजीव गांधी इनडोअर हॉलमध्ये पार पडली. पानगल प्रशालेच्या मुलांनी कौशल्य दाखवत अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी केली. या कामगिरीवर त्यांची नागपूर येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय फुटबॉल टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक अल्ताफ सिद्दिकी, नावेद मुनशी व इकबाल दलाल यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ हारून रशीद बागबान, उपमुख्याध्यापिका डॉ सुरैय्या परविन जहागीरदार, मोहम्मद अली शेख आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
पदक प्राप्त खेळाडू
सुवर्ण : अबू जैद अश्फाक हन्नुरे, मुजम्मिल शफिक पटेल.
रौप्य : आयान हसन बागबान, पटेल अब्दुल्ला मुजीबुर रहमान, कोतकुंडे अफन जाफर सादिक.