राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी राजेंद्र शिदोरे यांची नियुक्ती 

  • By admin
  • June 2, 2025
  • 0
  • 25 Views
Spread the love

पुणे ः पुणे येथील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच राजेंद्र शिदोरे यांची १४ ते २१ जून दरम्यान हरियाणा मधील गुरगाव येथे होणाऱ्या नऊ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने प्रमुख पंच म्हणून नियुक्ती केली आहे.

राजेंद्र शिदोरे हे क्रीडा भारती पुणे महानगरचे उपाध्यक्ष असून पुणे जनता सहकारी बँकेमध्ये इंटरनेट बँकिंगचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. राजेंद्र शिदोरे हे पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कलचे कार्यकारिणी सदस्य असून, पुणे जिल्हा ऑर्बिटर कमिशनचे चेअरमन देखील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *