कुस्ती प्रशिक्षक वसंतराव पाटील यांचा विशेष सन्मान

  • By admin
  • June 2, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

मुंबई ः अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठात महाराष्ट्र पत्रकार संघाच्या २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनात कुस्ती खेळात दिलेल्या भरीव योगदानासाठी भाईंदर येथील श्री गणेश आखाड्याचे वस्ताद वसंतराव पाटील यांचा खास सन्मान करण्यात आला. त्यांना कोल्हापूरी फेटा, शिल्ड, स्मृती चिन्ह, मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

गेली चार दशके वसंतराव पाटील हे कुस्ती या खेळात कार्यरत आहेत. स्वतः चांगले कुस्तीपटू असलेले पाटील गेली अनेक वर्षे‌ युवा पेहलवान घडवण्याचे मोठे काम करत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने या अधिवेशनास उपस्थिती लावली होती.

या प्रसंगी खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, माजी आमदार सुजित मिणचेकर, राजू किसनराव आवळे, विजयसिंह माने, विनायक भोसले, अविनाश बनगे, संघटना राज्याध्यक्ष कोळेकर, पोलिस निरीक्षक शरद मेमाणे, पोलिस उप अधीक्षक सदानंद सदाशिव या मान्यवरांच्या उपस्थितीत पाटील यांना गौरवण्यात आले. या पुरस्काराबद्दल वसंतराव पाटील यांचे मिरा भाईंदर वासियांतर्फे, श्री गणेश आखाड्यातील पदाधिकारी, वस्ताद, पैलवान, पालकांच्या वतीने खास अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *