
कोल्हापूर ः ताराराणी महिला कुस्ती केंद्र व शिवरत्न कुस्ती केंद्र शंकरनगर, अकलूज यांच्या वतीने आयोजित उन्हाळी प्रशिक्षण शिबिराची सांगता नुकतीच झाली.
या समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष शितल देवी धैर्यशील मोहिते पाटील, प्रमुख अतिथी म्हणून शिवरत्न शिक्षण संस्थेचे.सचिव धर्मराज दगडे, प्रशासकीय अधिकारी आश्रब शेख, संस्थेचे सर्व संचालक कुस्ती केंद्राच्या सर्व संचालक उपस्थित होते.
या शिबिरात कुस्ती केंद्राचे प्रशिक्षक सतपाल सिंग, एनआयएस प्रशिक्षक सुहास तरंगे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले या प्रशिक्षण शिबिरासाठी जिल्ह्यातील विविध भागातून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्याममध्ये २३ मुली व ४२ मुलांचा सहभाग होता. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब रणवरे यांनी केले.