
नागपूर ः फिट इंडिया मिशनच्या खेलो इंडिया योजने अंतर्गत संडे ऑन सायकल हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दर रविवारी हा उपक्रम राबण्यात येणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात निरोगी राष्ट्र उभारण्यासाठी नियमित शारीरिक व्यायाम व खेळाबाबत जनतेला शिक्षित करण्याची गरज व्यक्त केली होती. त्याअनुषंगाने नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे संडे ऑन सायकल हा उपक्रम राबवण्यात येणार आहे असे जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी सांगितले.
या संदर्भात मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात एक बैठक घेण्यात आली. या प्रसंगी कार्यकारी क्रीडा अधिकारी संदीप गवई यांनी याविषयी माहिती दिली. यावेळी अजय दलाल, अजय कांबळे, राहुल मांडवकर, निशांत पाटील, भूषण इंगळे, स्वप्नील बनसोड, अथर्व भोसले, जया कुलकर्णी, सोनाली मोकासे आदी उपस्थित होते.