महाराष्ट्र स्क्वॉश संघटनेतर्फे ११ जूनपासून राज्य स्क्वॉश चॅम्पियनशिप

  • By admin
  • June 3, 2025
  • 0
  • 31 Views
Spread the love

पुणे ः महाराष्ट्र स्क्वॉश असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय निवड चाचणी व अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धा ११ ते १५ जून या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा विविध वयोगटात होणार असल्याची माहिती राज्य अध्यक्ष डॉ प्रदीप खांड्रे यांनी दिली.

राज्य स्क्वॉश निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धा अंडर ११ मुले-मुली, अंडर १३ मुले-मुली, अंडर १५ मुले-मुली, अंडर १७ मुले-मुली अशा विविध वयोगटातील खेळाडूंची स्पर्धा ११ व १२ जून रोजी होणार आहे. १० जून रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खेळाडूंनी रिपोर्टिंग करणे आवश्यक आहे. या विविध वयोगटातील स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र स्क्वॉश अकॅडमी, उंड्री पुणे या ठिकाणी करण्यात येणार आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम १२ जून रोजी संध्याकाळी ५.३० वाजता होईल.

या स्पर्धेनंतर १३ ते १५ जून या कालावधीत अंडर १९ मुले-मुली आणि पुरुष-महिला या गटात राज्य स्क्वॉश स्पर्धा घेतली जाणार आहे अशी माहिती राज्य अध्यक्ष डॉ प्रदीप खांड्रे यांनी दिली. ही स्पर्धा महाराष्ट्र स्क्वॉश अकॅडमी उंड्री या ठिकाणी होणार आहे. १२ जून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खेळाडूंनी रिपोर्टिंग करणे आवश्यक आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम १५ जून रोजी दुपारी ४.३० वाजता होईल.

या विविध वयोगटातील राज्य स्क्वॉश स्पर्धेसाठी प्रवेश फॉर्म ८ जून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पाठवणे आवश्यक आहे. याची सर्व जिल्हा स्क्वॉश संघटनांनी नोंद घ्यावी असे आवाहन राज्य अध्यक्ष डॉ प्रदीप खांड्रे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *