जालना अॅथलेटिक्स संघाची शनिवारी निवड चाचणी 

  • By admin
  • June 3, 2025
  • 0
  • 22 Views
Spread the love

जालना ः जालना जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने वरिष्ठ गट निवड चाचणीचे आयोजन ७ जून रोजी जालना येथे करण्यात आले आहे. 

शिव छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे २१ ते २३ जून रोजी होणाऱ्या ७३व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी जालना जिल्ह्याचा संघ निवडायचा आहे. त्या करिता जालना जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने वरिष्ठ गट निवड चाचणीचे आयोजन ७ जून शनिवार रोजी सकाळी ८ वाजता जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी, रेल्वे स्टेशन रोड, जुना जालना येथे आयोजित केली जाणार आहे. सहभाग घेणाऱ्या खेळाडूंचे वय हे २४ ऑगस्ट २०२५ रोजी १६ वर्षांपेक्षा कमी नसावे याची खेळाडूंनी नोंद घ्यावी.

या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव डॉ. बाबु यादव, प्रमोद खरात, एकनाथ सुरुशे, संतोष मोरे व विकास काळे यांनी केले आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंना एएफआय यूआयडी असणे बंधनकारक असेल. याची सर्वांनी नोंद घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *