सायक्लोथॉन, वाकेथॉनने जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा

  • By admin
  • June 3, 2025
  • 0
  • 46 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः जागतिक सायकल दिनानिमित्त सायकलिस्ट फाऊंडेशन आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया रीजनल सेंटर यांच्यातर्फे सायक्लोथॉन आणि वाकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

कॅनॉट गार्डन येथे डॉ योगेश बेलापूरकर, डॉ झुबेर, डॉ विजय व्यवहारे यांच्या हस्ते सायक्लोथॉन व वाकेथॉनला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी अरुण गावंडे, प्रशांत महाले, जयंत सांगवीकर, मनीष जोशी, प्रसाद कोळेकर, किशोर केले, शिवाजी राजे, लक्ष्मण साळुंके, भास्कर मुंढे, लता शिरसाट, सचिन जोशी, सचिन गोडसे, प्रणिता बर्दापूरकर, कविता माळी, दर्शु फुलपगर, सिमॉन, श्रद्धा केदार, नुपूर भालेराव, माधव गोंगे, संध्या गोंगे, हेमंत भावसार, गजानन पिसे, जाधव, नारायण चकोर, नितीन चरेकर, धनंजय भाले, योगेश व्यवहारे, पवन, संजय शिंदे, वर्षा अतकरे, अनिल अतकरे आदी ७५ सायकलपटूंनी सहभाग घेतला होता.

जागतिक सायकलिंग दिनानिमित्त आयोजित २० किलोमीटर सायकलिंग आणि ३ किलोमीटर वाॅकींग स्पर्धेच्या उपक्रमात सायकलिंग फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी उत्स्फूर्त सहभागी होऊन सदरील स्पर्धेस भरभरून प्रतिसाद दिला.या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांसाठी आणि सायकलिंग फाउंडेशनच्या सदस्यांसाठी फाउंडेशन तर्फे स्पर्धेत सहभागी स्पर्धकांसाठी सहभाग प्रमाणपत्र, टी-शर्टचे वितरण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *