
धुळे ः राज्य वरिष्ठ अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी धुळे जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन ८ जून रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेतून राज्य स्पर्धेसाठी धुळे जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे.
महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने राज्य वरिष्ठ अॅथलेटिक्स स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे २१ ते २३ जून दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी धुळे जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार आहे. धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुलात रविवारी (८ जून) सकाळी ७ वाजता जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी अॅथलेटिक्स फेडरेशन इंडियाचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, सचिव प्रा नरेंद्र पाटील, कोषाध्यक्ष हेमंत भदाणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रशिक्षक प्रमोद पाटील (७४९८४६८६६२) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच साक्री तालुका धनंजय सोनवणे (9970608090), धुळे तालुका सुखदेव महाले (9579423710), शिंदखेडा तालुका अमोल पाटील (7776811488), शिरपूर तालुका सुभाष पावरा (9890292230), धुळे शहर प्रशांत पाटील (7758979574) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.