< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); आशियाई कराटे पदकविजेती भुवनेश्वरी जाधवचा नागरी सत्कार – Sport Splus

आशियाई कराटे पदकविजेती भुवनेश्वरी जाधवचा नागरी सत्कार

  • By admin
  • June 4, 2025
  • 0
  • 29 Views
Spread the love

पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते सन्मान

सोलापूर ः आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची मान्यता असलेल्या वर्ल्ड व एशियन कराटे फेडरेशनतर्फे ताश्कंद उझबेकीस्तान येथे झालेल्या आशियाई कराटे स्पर्धेत ऐतिहासिक कांस्य पदक जिंकलेल्या भुवनेश्वरी सुरेश जाधव हिचा भव्य नागरी सत्कार सोहळा पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

या नागरी सत्कार सोहळ्यास जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार उपस्थित होते. या सन्मान सोहळ्यात भुवनेश्वरीचे बंधू ट्रेडिशनल व स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे सचिव मिहिर जाधव यांनी तिच्या गत पाच वर्षांच्या मेहनत, सराव व संघर्ष, दुखापत, शस्त्रक्रिया, रिहॅब, पुन्हा कौशल्य प्रशिक्षण अशा खडतर साधनेच्या प्रवासाची तसेच आशियाई व जागतिक स्तरावरील कर्तृत्वाच्या क्षणचित्रांची तयार केलेली क्लिप दाखवली. संयोजन समितीतर्फे ओम भैय्या दरक यांनी स्वागत केले. आई संगीता सुरेश जाधव यांनी प्रास्ताविक करताना स्कूल व युनिव्हर्सिटी गेम्स, नॅशनल व एशियन गेम्समधील कराटेची सद्यस्थिती तसेच भविष्यातील संधींचाही उहापोह केला.

सिनेट सदस्य प्रा सचिन गायकवाड यांनी विद्यापीठ स्तरावरील कराटेची अंतर्भूतता व भुवनेश्वरीच्या माध्यमातून विद्यापीठाच्या कराटे खेळाडूंना मिळणारी संधी या निमित्ताने व्यक्त केली. भाजप क्रीडा प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष यशवंत पाथरुट यांनी समर्पक स्मृतिचिह्न प्रदान करुन भुवनेश्वरीचे अभिनंदन केले. क्रीडा भारतीचे पश्चिम महाराष्ट्र मंत्री ज्ञानेश्वर मॅकल यांनी सोहळ्याचा समन्वय साधला.

यावेळेस संस्कृती प्रतिष्ठानच्या माया गांधी, चंदा पाटील, आशा ठकराल, क्रीडा शिक्षक संघटनेचे सुहास छंचुरे, उज्वल मलजी, पाटील, शिवाजी वसपटे तसेच गट शिक्षण अधिकारी जमादार आणि रुद्रचे आकाश झळकेनवरु, शिवलीला स्पोर्ट्सचे शिवशरण वाणीपरीट व स्वामी, ओकीनावाचे प्रभु, माजी तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव यांच्यावतीने भुवनेश्वरीचा सत्कार करण्यात आला. रुद्र अकॅडमीचे पालक प्रतिनिधी साईनाथ यादव यांनी आभार मानले. सहस्त्रार्जुन प्रशालेचे मोरेश्वर काटवे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *