
अहमदाबाद ः राजस्थान रॉयल्सचा युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीला सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारासोबतच त्याला टाटा कर्व्ह कारही बक्षीस म्हणून मिळाली आहे. बिहारच्या वैभवने या हंगामात शानदार कामगिरी केली आणि त्याला त्याच्या शानदार कामगिरीचे फळ मिळाले आहे.
वैभव सूर्यवंशीचा पहिला हंगाम उत्तम होता. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने अनेक वादळी खेळी केल्या. डावखुरा फलंदाज वैभवने २८ एप्रिल रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध ३८ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने ११ षटकार आणि सात चौकार ठोकले. तो आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला. तो आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात जलद भारतीय खेळाडू बनला. त्याने युसूफ पठाणचा विक्रम मोडला.
वैभवला गाडी चालवता येणार नाही
वैभवने आयपीएलच्या पहिल्या हंगामात एकूण सात सामने खेळले. यामध्ये त्याने २०६.५५ च्या स्ट्राईक रेटने २५२ धावा केल्या. या दरम्यान त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. या शानदार कामगिरीसाठी त्याला सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझनचा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय त्याला टाटा कर्व्ह कार देण्यात आली. मनोरंजक गोष्ट म्हणजे वैभव ही गाडी चालवू शकणार नाही. याचे सर्वात मोठे कारण त्याचे वय आहे. खरं तर, तो सध्या फक्त १४ वर्षांचा आहे आणि त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नाही.
वैभवने आपली चमक दाखवली
वैभवने त्याच्या आयपीएल कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर शार्दुल ठाकूरचा सामना केला आणि पहिल्याच चेंडूवर षटकार मारून त्याच्यात किती प्रतिभा आहे हे दाखवून दिले. पहिल्याच आयपीएल सामन्यात २० चेंडूत ३४ धावांच्या खेळीने वैभवच्या प्रतिभेची झलक दाखवली. या हंगामात त्याने सात सामन्यांमध्ये २०६.५५ च्या स्ट्राईक रेटने २५२ धावा केल्या. यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतक समाविष्ट आहे. या हंगामात सात किंवा त्याहून अधिक सामने खेळणाऱ्यांमध्ये त्याचा स्ट्राईक दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम होता.