गिर्यारोहक किशोर नावकर यांना पीईएस कॉलेजतर्फे शुभेच्छा 

  • By admin
  • June 4, 2025
  • 0
  • 57 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः पीईएस कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन येथील माजी विद्यार्थी क्रीडा शिक्षक आणि प्रसिद्ध गिर्यारोहक किशोर नावकर हे जागतिक सेव्हन समिटपैकी आफ्रिका खंडातील माउंट किलीमंजारो ५८९५ मीटर (१९३४० फूट) हे शिखर सर करण्याकरिता बुधवारी (४ जून) रवाना झाले आहेत.

किशोर नावकर यांना इंडियन कॅडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे, ३६० एक्सप्लोरर एव्हरेस्टवीर डॉ आनंद बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ही गिर्यारोहण मोहीम ३६० एक्सप्लोररमार्फत आयोजित करण्यात आली आहे. मोहिमेच्या फ्लॅग ऑफ कार्यक्रमप्रसंगी पीईएस कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे प्राचार्य डॉ शिवाजी सूर्यवंशी यांच्या हस्ते हस्तांतरीत करण्यात आला. या प्रसंगी डॉ मंगेश डोंगरे, डॉ संतोष कांबळे, डॉ राजिंदर पठानिया, डॉ जी सूर्यकांत, डॉ श्यामला यादव,  अनिल बागुल, अक्षय दाणे, मुर्तजा बेग, पंकज सोनवणे, सुनील शिंदे आदी उपस्थित होते.सर्व शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी यांनी मोहिमेसाठी किशोर नावकर यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *