टायगर सिटी सायकलिंग असोसिएशनतर्फे जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा 

  • By admin
  • June 4, 2025
  • 0
  • 108 Views
Spread the love

नागपूर ः टायगर सिटी सायकलिंग असोसिएशनतर्फे जागतिक सायकलिंग दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 

या सायकल रॅलीमध्ये १२६ हून अधिक सायकलपटू सहभागी झाले होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ आर्य, जितेंद्र नायक, विजय लिमये यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला. 

सायकल रॅली ऑरेंज सिटी सिटी स्क्वेअर येथून सुरू झाली. या कार्यक्रमानिमित्त संघटनेतील यशस्वी खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सायकल रॅलीला टायगर अ‍ॅडव्हेंचर ग्रुप, नागपूर प्लॉगर्स, स्टेट बँक आणि बँक ऑफ इंडियाचे निवृत्त कर्मचारी आणि सायकल पोलो प्लेयर्स ग्रुप, नागपूर यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *