डॉ हेगडे चषक अंडर १४ जलद बुद्धिबळ स्पर्धा शनिवारी

  • By admin
  • June 4, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सल्लागार डॉ जगन्नाथराव हेगडे वाढदिवस चषक ७ ते १४ वर्षांखालील ६ वयोगटातील शालेय मुला-मुलींची जलद बुद्धिबळ स्पर्धा ७ जून रोजी परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना व लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन सहकार्याने होत असलेल्या या स्पर्धेमध्ये ७, ८, १०, ११, १३, १४ वर्षे वयोगटातील एकूण १२० विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कारासह गौरविण्यात येणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी दिली.

शालेय क्रीडा चळवळी अंतर्गत मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील सबज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी मार्फत यंदाही माजी नगरपाल डॉ जगन्नाथराव हेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय बुद्धिबळ स्पर्धा होत आहे. स्विस लीग पद्धतीच्या किमान ४ फेऱ्यांमध्ये सामने होतील. प्रत्येक साखळी फेरी १५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. संयोजकांतर्फे स्पर्धकांना बुद्धिबळ पट व घड्याळ दिली जाणार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (९३२४७ १९२९९) यांच्याकडे व्हॉटसअॅपवर ४ जूनपर्यंत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *