
नंदुरबार ः राज्यस्तरीय वरिष्ठ गट मैदानी अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी ७ जून रोजी नंदुरबार येथे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य ऍथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने राज्यस्तरीय वरिष्ठ गट मैदानी स्पर्धेचे आयोजन २१ ते २३ जून २०२५ दरम्यान पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा असोसिएशनच्यावतीने वरिष्ठ गट खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन ७ जून रविवार रोजी जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे करण्यात आले आहे.
या स्पर्धेत रनिंग, थ्रोईंग व जम्पिंग या वैयक्तिक क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. इच्छुक पुरुष व महिला खेळाडूंनी स्पर्धा ठिकाणी सकाळी ८ वाजता उपस्थित रहावे. येताना आधार कार्ड व दोन पासपोर्ट फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. या जिल्हा स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंना मुंबई येथे होणार्या राज्य स्पर्धेसाठी सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी व सचिव प्रा. दिलीप जानराव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धा संयोजक डॉ मयुर ठाकरे (९७६७६७७०५६) यांच्याशी संपर्क साधावा.