फ्रेंच ओपन स्पर्धेत कोको गॉफ उपांत्य फेरीत

  • By admin
  • June 5, 2025
  • 0
  • 1 Views
Spread the love

पॅरिस ः दुसरी मानांकित कोको गॉफ हिने अमेरिकेच्या मॅडिसन कीजचा ६-७, ६-४, ६-१ असा पराभव करून फ्रेंच ओपनच्या महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना फ्रान्सच्या वाइल्ड कार्डधारक लोई बोइसनशी होईल जिने सहाव्या मानांकित मिरा अँड्रीवाचा ७-६, ६-३ असा पराभव केला.

२२ वर्षीय बोइसन १९८९ नंतर तिच्या पदार्पणाच्या ग्रँड स्लॅममध्ये उपांत्य फेरी गाठणारी पहिली महिला खेळाडू ठरली. त्यावेळी मोनिका सेलेस आणि जेनिफर कॅप्रियाती यांनी ही कामगिरी केली होती. १९९९ मध्ये विम्बल्डनमध्ये अमेली मॉरेस्मोनंतर ग्रँड स्लॅम फायनलमध्ये पोहोचणारी ती सर्वात तरुण फ्रेंच खेळाडू आहे.

पुरुषांच्या गटात, नोवाक जोकोविच आणि नंबर वन खेळाडू यानिक सिनर हे उपांत्य फेरीत एकमेकांसमोर येतील. जोकोविचने तिसऱ्या क्रमांकाच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हचा ४-६, ६-३, ६-२, ६-४ असा पराभव करून अंतिम चारमध्ये प्रवेश केला, तर सिनेरने बिगरमानांकित अलेक्झांडर बुब्लिकचा ६-१, ७-५, ६-० असा पराभव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *