आयडियल दुहेरी कॅरम स्पर्धेत शालेय खेळाडूंसह पालकांच्या ३४ जोड्यांचा सहभाग

  • By admin
  • June 5, 2025
  • 0
  • 10 Views
Spread the love

मुंबई ः विविध जिल्ह्यातील राष्ट्रीय ख्यातीच्या ज्युनियर कॅरमपटूंसह शालेय ३४ खेळाडू आपल्या पालकांसोबत जोडीने आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप आयोजित डॉ जगन्नाथराव हेगडे वाढदिवस चषक विनाशुल्क दुहेरी कॅरम स्पर्धेत विजेतेपदासाठी झुंजणार आहेत. 

उदयोन्मुख शालेय कॅरमपटू आयएनजी स्कूल-वसईचा श्रीशान पालवणकर व पालक हेमंत पालवणकर विरुद्ध भरत सावंत व विश्वनाथ सावंत जोडीमधील उद्घाटनीय लढत ७ जून रोजी परेल येथील आरएमएमएस सभागृहात रंगणार आहे. 

आरएमएमएस व लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन सहकार्यीत स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरपाल डॉ जगन्नाथराव हेगडे, क्रीडाप्रेमी गोविंदराव मोहिते, प्रशिक्षक सचिन शिंदे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत होईल.    
राष्ट्रीय ज्युनियर कॅरमपटू सिमरन शिंदे व मानसी शिंदे, तनया व विजय दळवी, पुष्कर व कोमल गोळे, वेदांत व संजय लोखंडे, वेदिका व सुभाष पोमेंडकर, चिन्मय व सोनल दरेकर, कौस्तुभ व मंगेश जागुष्टे, प्रसाद व सुहास माने, अर्णव व अश्विनी गावडे, केवल व अमोल कुळकर्णी, मयुरेश व शिवनाथ पवार, स्वरा व सुरज मोहिरे, ग्रीष्मा व महेंद्र धामणकर, देविका व पंकज जोशी, आर्यन व राजप्रसाद राऊत, सारा व सागर देवन, प्रसन्न व सूर्यकांत गोळे आदी शालेय कॅरमपटू व त्यांच्या पालकांच्या जोड्या अजिंक्यपद पटकावण्यासाठी निकराच्या लढती देतील. 

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीमार्फत गेली अनेक वर्षे राबवीत असलेल्या शालेय क्रीडा चळवळीमध्ये नामवंत माजी कॅरमपटू असलेल्या पालकवर्गाचे योगदान लक्षात घेऊन एका नव्या स्वरूपाचा पूर्णपणे मोफत उपक्रम संयोजक लीलाधर चव्हाण साकारीत आहेत. पहिल्या आठ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक पुरस्कार दिले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *