
ठाणे ः आशियाई मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत क्रीडा शिक्षक सागर धनाजी शेलार याने सुवर्णपदक पटकावत स्पर्धा गाजवली.
काठमांडू (नेपाळ) येथे आशियाई मिक्स बॉक्सिंग स्पर्धा झाली. या स्पर्धेत नालासोपारा येथील रहिवासी आणि विरार येथील भारती ज्ञानगंगा इंग्लिश हायस्कूलचे क्रीडा शिक्षक सागर शेलार याने ६५ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्राचा सन्मान वाढवला.
या शानदार कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे मुंबई विभागाचे संपर्कप्रमुख आणि ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद वाघमोडे यांनी सागर शेलार यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.