राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सिद्धी कामठे, तनिक्षा काकडेला सुवर्णपदक 

  • By admin
  • June 5, 2025
  • 0
  • 207 Views
Spread the love

पुणे ः पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील चांबळी गावातील सिद्धी सुर्यकांत कामठे व सिंहगड रोड, सनसिटी मधील तनिक्षा काकडे हिने डेहराडून उत्तराखंड या ठिकाणी पार पडलेल्या चौथ्या नॅशनल तायक्वांदो कॅडेट व ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे.

या स्पर्धेत धनश्री पवार, सुजय नरुटे व प्रिंन्स शर्मा यांनी कांस्य पदक मिळवून त्यांची आशियाई चॅम्पियनशिप निवड कॅम्पसाठी निवड निश्चित केली. या सर्व राष्ट्रीय खेळाडूंना पुणे जिल्हा संघटनेचे सचिव दत्तात्रय कदम, उपाध्यक्ष प्रणव निवंगुणे, सुमित खंडागळे व सुरेश राठोड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

तसेच सिद्धी कामठे व तनिक्षा काकडे यांचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष संदीप ओंबासे तसेच महासचिव गफ्फार पठाण व खजिनदार डॉ प्रसाद कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आणि जून महिन्यात होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप इंडिया टीम सिलेक्शन कॅम्पसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *