रक्तदान शिबिराने कमांडर विनोद नरवडे यांचा वाढदिवस साजरा

  • By admin
  • June 5, 2025
  • 0
  • 30 Views
Spread the love

४० रक्तदात्यांचे रक्तदान

छत्रपती संभाजीनगर ः इंडियन कँडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पाच जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन जगदीश खैरनार, अजय भोसले, विजय पाटील यांच्या हस्ते झाले. या रक्तदान शिबिरात निशा दंडगव्हाळ, वेदांत खैरनार, राधा निकाळजे, अयोध्या गायकवाड या महिला रक्तदात्यांनी प्रथमच रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात जवळपास ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

विशेष म्हणजे सर्व रक्तदात्यांची व तेथील सर्व कॅडेट्स व तेथील नागरिकांची शारीरिक तपासणी कविता खैरनार व जगदीश खैरनार यांनी त्यांची शारीरिक तपासणी करून त्यांच्या उंचीनुसार किती वजन पाहिजे याची संपूर्ण माहिती दिली.
या रक्तदान प्रसंगी किशोर नरवडे, बबलु त्रिवेदी, प्रवीण जैस्वाल, प्रमोद नरवडे, जयंत कुलकर्णी, भगवान खाडे, अनिल भवर, पंकज वाडेकर, निलेश कर्डिले, प्रदीप शेंडगे, राहुल अहिरे, सुरेश भापकर, अवधूत अंधारे, आदित्य नरवडे, जयराज नरवडे, कविता खैरनार व आयसीएफचे कॅडेट्स यांनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

लायन्स रक्तपेढी व शासकीय रुग्णालय रक्तपेढी या रक्तपेढींनी रक्त संकलन करण्यात आले. रक्तदान शिबिरासाठी शामराव सोनवणे, डॉ बाबासाहेब कळमकर, डॉ निखिल जाधव, डॉ श्रद्धा देशटवाड, डॉ मेघा गंगेले यांनी रक्तदात्यांचे रक्त संकलन केले. त्यासाठी सर्व आयसीएफ परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *