
नांदेड ः नांदेड जिल्हा स्क्वॉश रॅकेट असोसिएशन यांच्या वतीने पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेसाठी शनिवारी (७ जून) जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेतून पुणे येथे ११ ते १५ जून दरम्यान होणाऱया राज्यस्तरीय स्क्वॉश स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्याचा संघ निवडण्यात येईल. नांदेड जिल्हा निवड चाचणी स्पर्धा विश्रामगृह कोर्ट येथे ७ जून रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे. खेळाडूंनी सोबत आधार कार्ड दोन फोटो आणणे आवश्यक आहे. या निवड चाचणीसाठी जिल्ह्यातून जास्तीत जास्त खेळाडूंचा सहभाग नोंदवावा असे जिल्हा संघटनेतर्फे करण्यात आले आहे.