१०० आरएएफ संघाला वेटलिफ्टिंग स्पर्धेत विजेतेपद

  • By admin
  • June 6, 2025
  • 0
  • 31 Views
Spread the love

नागपूर ः नागपूर येथे आयोजित सीआरपीएफ इंटर बटालियन ऑप्स वेटलिफ्टिंग स्पर्धेत १०० आरएएफ संघाने विजेतेपद पटकावले.

पोलिस महानिरीक्षक पश्चिम क्षेत्र सीआरपीएफ मुंबई यांच्या अधीन असलेल्या बटालियन आणि ग्रुप सेंटरमधील एकूण १० संघांनी ग्रुप सेंटर नागपूर येथे आयोजित इंटर बटालियन ऑप्स वेटलिफ्टिंग स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेचा ४ जून रोजी समारोप झाला. या स्पर्धेत १०० आरएएफ संघाने प्रथम क्रमांक, १०२ आरएएफ संघानेने द्वितीय क्रमांक आणि ग्रुप सेंटर नागपूर संघाने तृतीय क्रमांक पटकावला.

विजेत्या आणि उपविजेत्या संघाला ग्रुप सेंटर सीआरपीएफ नागपूरचे उपमहानिरीक्षक अनिल कुमार यांच्या हस्ते पदके आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. या प्रसंगी उपमहानिरीक्षक अनिल कुमार यांनी आपल्या समारोपीय भाषणात सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आणि सर्व संघांनी स्पर्धेत संघभावनेने कामगिरी केली आणि त्यांच्या तंदुरुस्तीचे कौतुक केले. शारीरिक तंदुरुस्ती प्रत्येक खेळाडूंसाठी खूप महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ एम के सिन्हा, उपमहानिरीक्षक (वैद्यकीय), जी डी पंढरीनाथ कमांडंट, ग्रुप सेंटर नागपूर, पूजा पवार कमांडंट २१३ (महिला) बटालियन नागपूर, बी एल मीना डेप्युटी कमांडंट ग्रुप सेंटर नागपूर, इतर अधिकारी, कनिष्ठ अधिकारी आणि जवानांनी या स्पर्धेला प्रोत्साहन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *