नायगाव येथे रविवारी अंध पाॅवरलिफ्टिंग खेळाडूंची स्पर्धा

  • By admin
  • June 6, 2025
  • 0
  • 2 Views
Spread the love

मुंबई ः पॅरा ब्लाइंड स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र व महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या वतीने रविवारी (८ जून) नायगाव पोलिस व्यायाम शाळा भोईवाडा मुंबई या ठिकाणी अंध पॉवरलिफ्टिंग खेळाडूंची स्पर्धा व निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील अंध पॉवरलिफ्टर यांचा या स्पर्धेत सहभाग असेल. त्यांना याबाबत माहिती देऊन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. रविवारी दुपारी एक वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेमधून अंध पॉवरलिफ्टर्सचा महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात येणार आहे. हा संघ २० ते २२ जून २०२५ या कालावधीत उडपी-कर्नाटक या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. अधिक माहितीसाठी पंकज चौधरी (9869329141), संजय सरदेसाई (8691983111) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *