अहिल्यानगर येथे रविवारी अंडर ११ बुद्धिबळ स्पर्धा

  • By admin
  • June 6, 2025
  • 0
  • 81 Views
Spread the love

अहिल्यानगर ः अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेमार्फत ११ वर्षांखालील खेळाडूंसाठी रविवारी (८ जून) जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत १ जानेवारी २०१४ नंतर जन्मलेले अहिल्यानगर जिल्ह्यातील खेळाडू भाग घेऊ शकतील.

अहिल्यानगर येथील शांती ज्युनियर्स, आदर्श कॉलनी, साधना हाऊसिंग सोसायटी, प्रोफेसर चौक, अहिल्यानगर येथे या स्पर्धेचे नियोजन केले असून रविवारी सकाळी ९.३० वाजता स्पर्धेचे उद्घाटन केले जाईल.

पुणे येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्ह्याचा मुलांचा व मुलींचा संघ या स्पर्धेतून निवडण्यात येणार आहे. अंतिम निकाल पत्रका प्रमाणे २ मुले व २ मुली, म्हणजेच प्रथम २ खेळाडू राज्यस्तरावर पाठविण्यात येतील. अहिल्यानगर जिल्ह्यातून निवड झालेल्या खेळाडूंची राज्य निवड चाचणी स्पर्धेची प्रवेश फी १ हजार रुपये संघटनेमार्फत भरली जाईल व तेथे राहण्याची व्यवस्था सुद्धा केली जाईल. तसेच पहिल्या पाच खेळाडूंना (मुले व मुली) आकर्षक करंडक सुद्धा देऊन गौरवण्यात येणार आहे

ही स्पर्धा ११ वर्षांखालील मुले व मुली खेळाडूंसाठी खुली असून खेळाडूंनी येताना बुद्धिबळ पट, सोंगट्या, जेवणाचा डबा व पिण्याचे पाणी आणावे. सर्व सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रवेश ऑनलाईन स्वीकारले जाणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटना प्रयत्नशील असून अहिल्यानगर जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे स्पर्धेत सहभाग नोंदवावा.अधिक माहितीकरिता सचिव यशवंत बापट (९३२६०९२५०१), पारूनाथ ढोकळे (९८५०७०४२६८), प्रशांत धंगेकर (९९२१३७७९८८), देवेंद्र ढोकळे (८६००४१२६३३) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *