पुणे ः पुणे जिल्हा स्क्वॅश रॅकेट संघटनेतर्फे निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. महिला व पुरुष या वरिष्ठ गटासह विविध वयोगटात ही स्पर्धा घेतली जाणार आहे.
ही निवड चाचणी स्पर्धा ११ वर्षांखालील मुले-मुली, १३ वर्षांखालील मुले-मुली, १५ वर्षांखालील मुले-मुली, १७ वर्षांखालील मुले-मुली, १९ वर्षांखालील मुले-मुली अशा विविध वयोगटांसह महिला व पुरुष अशा गटात घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा उंड्री येथील महाराष्ट्र स्क्वॅश अकादमी या ठिकाणी होणार आहे. या निवड चाचणी स्पर्धेत विविध वयोगटातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन सचिव आनंद लाहोटी यांनी केले आहे.