पश्चिम विभागीय स्ट्रेंग्थलिफ्टिंग स्पर्धेत पाच राज्यांचा सहभाग

  • By admin
  • June 8, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

१६० खेळाडूंमध्ये चुरस, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणार

नागपूर ः महाराष्ट्र स्ट्रेंग्थलिफ्टिंग असोसिएशन, नागपूरच्या यजमानपदाखाली दुसऱ्या पश्चिम विभागीय स्ट्रेंग्थलिफ्टिंग स्पर्धेचे ज्युनियर,वरिष्ठ, मास्टर्स आणि दिव्यांग अशा गटात आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पाच राज्यांतील १६० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. 

सिव्हील लाईन्सस्थित आमदार निवास सभागृहात आयोजित तीन दिवसांच्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगडमधील १६० खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची निवड राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी केली जाईल.

या स्पर्धेचे उद्घाटन आमदार विकास ठाकरे, महाराष्ट्र वूडबॉल संघटनेचे अध्यक्ष कुमार मसराम, राधिकाताई पांडव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गिरिष पांडव, ज्येष्ठ क्रीडा संघटक हेमंत डोणगावकर आदींनी फित कापून स्पर्धेला सुरूवात केली. या प्रसंगी विदर्भ योगासन संघटनेचे चेअरमन राजीव इटकेलवार, महाराष्ट्र आर्म रेसलिंग संघटनेचे कार्याध्यक्ष प्रमोद वालमांडरे, विदर्भ ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष किशोर बागडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

स्ट्रेंथलिफ्टिंगमध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल हेमंत कुमार डोणगावकर, सतीश यादव, इंडियन स्ट्रेंथलिफ्टिंग फेडरेशनचे महासचिव बाबुल विकास पत्रोनबीस यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक महाराष्ट्र स्ट्रेंथलिफ्टिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ श्रीकांत वरणकर यांनी केले. आयोजन सहसचिव सौरभ रंगारी यांनी संचालन केले तर संदीप मोहंतो यांनी आभार मानले. 

स्पर्धा आयोजनासाठी सचिन माथने (अध्यक्ष) आनंद डाबरे (महासचिव महाराष्ट्र), सचिन कलनाके, लक्ष्मीकांत मेश्राम, चंद्रशेखर ढबाले, राजू वाघमारे, नितीन गचके, श्रेयस रंगारी, सम्यक लांजेवार, अजय वाघमारे, हिमांशी तायवाडे, अनघा पोळ, श्रुती भेलावे, प्रिन्सी कोसरे आदी परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *