१८ वर्षांखालील पहिली मुले आणि मुलींची राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा पुण्यात

  • By admin
  • June 8, 2025
  • 0
  • 0 Views
Spread the love

मुंबई ः महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली १८ वर्षांखालील मुले आणि मुली यांची राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा पुण्यात रंगणार आहे.

शिवशक्ती महिला मंडळाच्या यजमानपदाखाली होणाऱ्या या स्पर्धेला आमदार बाबाजी काळे व बापूसाहेब पठारे यांचे सहकार्य लाभले असून १४ ते १८ जून दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. ही कबड्डी स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज संकुल, म्हाळुंगे- बालेवाडी, पुणे येथे होईल. यामध्ये महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांचे एकूण ३१ संघ सहभागी होणार आहेत.

या निवड स्पर्धेतून निवडण्यात आलेला संघ हरिद्वार (उत्तर प्रदेश) येथे २८ जून ते १ जुलैपासून होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ १४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता शिवसेना युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या स्पर्धेसाठी २५ जिल्ह्यांतील सुमारे १,००० खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापक सहभागी होणार असून, ९०० हून अधिक खेळाडूंसाठी निवास व भोजनाची सोय करण्यात आली आहे. ३१ संघाचा सहभाग स्पधेत असेल.बालेवाडी येथील बंदिस्त क्रीडा संकुलातील चार मैदाने आणि इतर क्रीडांगणांवर ही स्पर्धा होईल.

स्पर्धेतील सहभागी संघ
१. मुंबई शहर पूर्व, २. मुंबई शहर पश्चिम, ३. मुंबई उपनगर पूर्व, ४. मुंबई उपनगर पश्चिम, ५. ठाणे शहर, ६. ठाणे ग्रामीण, ७. रायगड, ८. रत्नागिरी, ९. सिंधुदुर्ग, १०. पुणे शहर, ११. पुणे ग्रामीण, १२. पिंपरी-चिंचवड, १३. अहमदनगर, १४. सातारा, १५. सांगली, १६. कोल्हापूर, १७. नाशिक शहर, १८. नाशिक ग्रामीण, १९. जळगाव, २०. धुळे, २१. बीड, २२. धाराशिव, २३. लातूर, २४. जालना, २५. छत्रपती संभाजीनगर, २६. परभणी, २७. नांदेड, २८. सोलापूर, २९. हिंगोली, ३०. नंदुरबार, ३१. पालघर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *