
ठाणे ः ज्ञानपीठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मनोरमा नगर, ठाणे यांचे संस्थापक अध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबासाहेब दगडे यांनी प्रमोद वाघमोडे यांच्या सोसायटी कार्यालयात सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमोद वाघमोडे यांची नुकतीच विविध मान्यपदांवर निवड झाल्याबद्दल हा सत्कार आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ मुंबई विभाग संपर्कप्रमुख आणि ठाणे जिल्हाध्यक्ष, महाराणी अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य, मुंबई (कोकण विभागीय सचिव) तसेच स्पोर्ट्स प्लस या देशातील पहिल्या डिजिटल क्रीडा दैनिकाचे सहसंपादक अशी विविध पदांचा पदभार प्रमोद वाघमोडे यांनी स्वीकारला आहे.
या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये पोलीस अधिकारी कदम, पीएसआय चव्हाण, आगवणे, मुलानी, शिरंगारे, तसेच सोसायटीचे लेखापाल संतोष आंग्रे यांचा समावेश होता.
या प्रसंगी बाबासाहेब दगडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, प्रमोद वाघमोडे हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांची झपाट्याने होत असलेली प्रगती ही प्रेरणादायी असून, अशा कार्यक्षम व्यक्तिमत्त्वाला सर्वांनी साथ आणि सहकार्य करणे ही काळाची गरज आहे.