नेपाळ येथे गणेश पेरे यांचा विशेष सन्मान

  • By admin
  • June 8, 2025
  • 0
  • 11 Views
Spread the love

चिखली : नेपाळ येथे झालेल्या वर्ल्ड एशियन मिंक्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत बेस्ट ऑफिशियल म्हणून गणेश पेरे यांचा सन्मान करण्यात आला.

या स्पर्धेत एकूण सहा देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेकरीता एकूण ९ ऑफिशियल, १२ रेफ्री होते. त्यामध्ये भारतातून मिक्स बॉक्सिंग असोसिएशनचे बुलडाणा सचिव गणेश पेरे यांची ऑफिशियल म्हणून निवड झाली होती व त्यांनी नेपालमध्ये उत्तमरित्या जबाबदारी पार पाडली. त्यामुळे एशियन मिक्स बॉक्सिंग असोसिएशन नेपा​ळ काठमांडू व गव्हमेंट ऑफ नेपाल महानगरपालिका व ऑर्गनाइजर सुमन लाम्बा आणि वर्ल्ड मिक्स बॉक्सिंग ग्रँडमास्टर राकेश म्हसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश पेरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *