< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); शिक्षकांचा जीव धोक्यात आणणारे परिपत्रक रद्द करावे – Sport Splus

शिक्षकांचा जीव धोक्यात आणणारे परिपत्रक रद्द करावे

  • By admin
  • June 9, 2025
  • 0
  • 114 Views
Spread the love

राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर यांची मागणी

पुणे ः शासनाच्या असंवेदनशील परिपत्रकामुळे शिक्षक धास्तावलेले असून या परिपत्रकाचा महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर, मुंबई विभाग सचिव अंकुश आहेर, मुंबई विभाग संपर्कप्रमुख प्रमोद वाघमोडे यांनी या परिपत्रकाचा निषेध केला असून मानसिक तणाव वाढवणाऱ्या परिपत्रकाचा तत्काळ पुनर्विचार करावा अशी मागणी केली आहे.

शासनाच्या असंवेदनशील परिपत्रकामुळे शिक्षक धास्तावलेले आहेत. शिक्षकांचा जीव धोक्यात आला आहे. ८ जून रोजी चिपळूण-रत्नागिरी मार्गावर प्रशिक्षणासाठी निघालेल्या शिक्षकांच्या मिनी बसला अपघात झाला. या अपघातात अनेक शिक्षक गंभीर जखमी झाले. तिघांची प्रकृती अधिक गंभीर आहे. शासनाच्या असंवेदनशील परिपत्रकातील मिलिटरी भाषेमुळे शिक्षकांवर मानसिक ताण निर्माण झाला आहे. १०० टक्के उपस्थिती नसेल तर प्रशिक्षणातून बाद या आदेशामुळे शिक्षक जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. शिक्षकांचे मानसिक संतुलन बिघडवणाऱया या परिपत्रकाचा संघटनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला.

अपघातग्रस्त शिक्षकांवर तात्काळ व शासन खर्चाने उपचार व्हावेत, नुकसान भरपाई देण्यात यावी, उपस्थितीचा निकष १०० टक्के ऐवजी ७५ टक्के करण्यात यावा, अपघातग्रस्त शिक्षकांची हजेरी १०० टक्के गृहित धरावी व त्यांना पुढील कालावधीत सवलत मिळावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर, मुंबई विभाग सचिव अंकुश आहेर, मुंबई विभाग संपर्क प्रमुख प्रमोद वाघमोडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *