कोल्हापूर येथे २० जूनपासून राज्य कॅरम स्पर्धा

  • By admin
  • June 9, 2025
  • 0
  • 8 Views
Spread the love

मुंबई ः श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ९ वी राज्य मानांकन कॅरम स्पर्धा २० ते २२ जून दरम्यान हॉटेल मंगलम, नरसोबावाडी, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा हौशी कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात येणारी ही कॅरम स्पर्धा पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये खेळवली जाणार असून विजेत्यांना तब्बल १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके व चषक देण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी नावे नोंदविण्याची शेवटची तारीख ११ जून २०२५ असून स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी खेळाडूंनी आपल्या जिल्हा कॅरम संघटनेशी संपर्क साधावा. स्पर्धेचे प्रवेश अर्ज प्रवेश फी सहित संलग्न जिल्हा कॅरम संघटनेमार्फत महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, राजा राणी चौका जवळ, शिवाजी पार्क, दादर येथे दिनांक ९ ते ११ जून २०२५ पर्यंत सायंकाळी ६.३० ते ८.३० दरम्यान स्वीकारण्यात येतील. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ येथे संपर्क साधावा असे आवाहन मानद सचिव अरुण केदार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *