प्रो कबड्डी लीग पर्व १२ : महाराष्ट्रातील खेळाडूंची घसरण

  • By admin
  • June 9, 2025
  • 0
  • 9 Views
Spread the love

यंदा केवळ ३२ खेळाडूंना मिळाली संधी

मुंबई ः प्रो कबड्डी लीग पर्व १२ साठी नुकत्याच पार पडलेल्या खेळाडूंच्या लिलावात महाराष्ट्रातील एकूण ३२ खेळाडूंना संघांमध्ये स्थान मिळाले आहे. मागील हंगामात ही संख्या ४३ होती, त्यामुळे यंदा ११ खेळाडूंची घट झाली आहे.

ही घट महाराष्ट्रातील कबड्डीच्या वाढत्या स्पर्धात्मकतेसाठी चिंतेची बाब असली, तरी काही संघांनी स्थानिक खेळाडूंवर विश्वास दाखवत त्यांना संधी दिली आहे.

संघनिहाय महाराष्ट्रातील खेळाडूंची संख्या

१. पुणेरी पलटन – अस्लम इनामदार, पंकज मोहिते, आदित्य शिंदे, दादासाहेब पुजारी, अभिषेक गुंगे, वैभव राबाडे, रोहन तुपारे.

२. बेंगळुरू बुल्स – आकाश शिंदे, शुभम बिटके, शुभम रहाटे, साहिल राणे.

३. तमिळ थलाइवाज – अनुज गावडे, धीरज बैलमारे, अमिराज पवार, सुरेश जाधव.

४. तेलगू टायटन्स – शुभम शिंदे, अजित पवार, शंकर गदाई, प्रफुल्ल झावरे.

५. पाटणा पायरेट्स – संकेत सावंत, बालाजी जाधव, साहिल पाटील.

६. हरियाणा स्टीलर्स – शिवम पटारे, विशाल नाटे, विकास जाधव.

७. दबंग दिल्ली – अजिंक्य पवार, अरकम शेख.

८. यूपी योद्धास् – प्रणय राणे, जयेश महाजन.

९. यू मुंबा – अजित चौहान.

१०. बंगाल वॉरियर्स – मयूर कदम.

११. गुजरात जायंट्स – एकही महाराष्ट्राचा खेळाडू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *