
पुणे ः कोकणस्थ परिवार, पुणेचे वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल रेणू राजन शिरधनकर यांचा खास सत्कार ज्येष्ठ संचालिका विनया पेडणेकर यांच्या हस्ते सोमवारी पुण्यात करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनिया नेवरेकर होत्या. रेणू राजन शिरधनकर यांनी अंध अपंग मुला, मुलीचे उन्नतीसाठी संस्थेचे माध्यमातून अनेक उपक्रम राबवले आहेत. प्रिया पेडणेकर यांनी स्वागत केले. कविता सावळ यांनी प्रास्ताविक केले. प्रीती निकम यांनी सूत्रसंचलन केले. वनिता उत्तेकर यांनी आभार मानले.