लातूर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेतर्फे निवड चाचणी स्पर्धा

  • By admin
  • June 10, 2025
  • 0
  • 26 Views
Spread the love

लातूर ः लातूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने ११ व १२ जून रोजी सकाळी सात वाजता महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा घेण्यात येणार आहे.

ही स्पर्धा खुला गट पुरुष व महिला याप्रमाणे घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतून लातूर जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना २१ ते २३ जून या कालावधीत पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सहभाग घेता येणार आहे. खेळाडूंनी स्पर्धेस येताना क्रीडा प्रकार शुल्क, जन्म तारखेचा दाखला ही कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे सचिव ॲड विक्रम संकाये, सहसचिव निजाम शेख, कार्याध्यक्ष प्रा व्ही आर हुडगे, प्रा सतीश मुंढे, प्रा सचिन चामले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *