बीडच्या जिमखाना क्रिकेट क्लबला उपविजेतेपद 

  • By admin
  • June 10, 2025
  • 0
  • 100 Views
Spread the love

बीड ः शिर्डी येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय अंडर १९ टी २० क्रिकेट स्पर्धेत बीडच्या जिमखाना क्रिकेट क्लबने शानदार कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. 

या स्पर्धेत बीडच्या जिमखाना क्रिकेट क्लबने अंतिम सामन्यात धडक मारुन चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेतील सर्व सामन्यांमध्ये बीड जिमखाना क्रिकेट क्लब कडून क्षितिज जोगदंड व सौरभ राठोड यांनी अत्यंत चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये या कामगिरीची नोंद करण्यात आली.

या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजीसाठी क्षितिज जोगदंड याला उत्कृष्ट फलंदाज घोषित करण्यात आले. तसेच उत्तम गोलंदाजी करणारा बीड जिमखाना क्रिकेट क्लबचा अष्टपैलू खेळाडू सौरभ राठोड याला देखील दोन सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे जिमखाना क्रिकेट क्लबचे उदयोन्मुख गोलंदाज अंडर १४ गटातील खेळाडू यश रेंगे व रोहित लोणके यांनी देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना आपल्या उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन करत मोठ्या वयोगटातील स्पर्धेत आपली छाप  पाडली आणि संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यासाठी हातभार लावला.

विजेता संघ 
वैभव पवार (कर्णधार), ओंकार काळे, सौरभ राठोड (उपकर्णधार), क्षितिज जोगदंड, कौशल मंकले, अनिकेत खराडे, श्रवण गालफाडे, धैर्यशील शिंदे, ओंकार शिंदे,  निखिल वाघ, यश रेंगे, रोहित लोणके,  अनुराग अबुज, मल्हार खेरोडकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *