आरसीबी संघाची किंमत १७ हजार कोटी ! 

  • By admin
  • June 10, 2025
  • 0
  • 36 Views
Spread the love

आयपीएल चॅम्पियन संघाच्या विक्रीची जोरदार चर्चा 

नवी दिल्ली ः इंडियन प्रीमियर लीगच्या म्हणजेच आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विकला जात आहे. आरसीबी संघाची किंमत १७ हजार कोटी रुपये ठेवण्यात आली असल्याची सोशल मीडियात चर्चा आहे. 

सध्या आरसीबी संघाचा मालक युनायटेड स्पिरिट लिमिटेड आहे, जो मॅकडॉवेलची व्हिस्की बनवणारी कंपनी आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, स्पिरिट लिमिटेड आरसीबी विकण्याची तयारी करत आहे. जर आरसीबी संघ विकला गेला तर तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा करार असेल, कारण आरसीबीच्या मालकाने संघ विकण्यासाठी मोठ्या किमतीचा विचार केला आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, युनायटेड स्पिरिट लिमिटेड कंपनीने आरसीबीला सुमारे १७ हजार कोटी रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी युनायटेड स्पिरिट लिमिटेड विजय मल्ल्यांची होती, परंतु जेव्हा मल्ल्या दिवाळखोरीत निघाला तेव्हा ही कंपनी ब्रिटिश कंपनी डायजिओने विकत घेतली. आता डायजिओ आरसीबी संघाचा मालक आहे.

२००८ मध्ये आरसीबीची किंमत इतकीच होती

आयपीएलच्या सुरुवातीला म्हणजेच २००८ मध्ये आरसीबीची किंमत १११.६ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ४७६ कोटी रुपये होती. तेव्हा आरसीबी आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा संघ होता. विजय मल्ल्याने आरसीबीची मालकी त्यांच्या कंपनी युनायटेड स्पिरिट लिमिटेडला दिली होती. २०१४ मध्ये ब्रिटीश कंपनी डियाजियोने युनायटेड स्पिरिट लिमिटेडमध्ये मोठा हिस्सा खरेदी केला आणि त्यानंतर २०१६ मध्ये कंपनीने संपूर्ण आरसीबी विकत घेतली.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा करार
जर आरसीबी संघ १७ हजार कोटी रुपयांना विकला गेला तर तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा करार असेल. यापूर्वी कोणताही संघ इतक्या मोठ्या किमतीत विकला गेला नाही. आयपीएलमध्ये जेव्हा दोन नवीन संघ आले तेव्हा लखनौ सुपर जायंट्सला आरपीएसजी ग्रुपने ७,०९० कोटी रुपयांना विकत घेतले. त्याच वेळी सीव्हीसी कॅपिटलने गुजरात टायटन्सला ५,६२५ कोटी रुपयांना विकत घेतले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *