
रायगड ः पानीपत (हरियाणा) येथे झालेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट फेडरेशन कप स्पर्धेसाठी रोहित भोमटे आणि प्रफुल्ल पारधी या दोघांची रायगड जिल्ह्यातून महाराष्ट्र संघात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ही स्पर्धा ४ ते ६ जून या कालावधीत पानीपत येथे झाली आहे. इंडिया फेडरेशनचे सेक्रेटरी मीनाक्षी गिरी तसेच संदीप पाटील व विलास गिरी तसेच रायगड जिल्हा सचिव स्वप्निल अडूरकर आदींनी या खेळाडूंचे अभिनंदन केले. हे दोन खेळाडू माथेरान व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल व नामांकित वसतिगृह वंजारपाडा नेरळ येथे शिकत आहे.या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत या खेळाडूंनी महाराष्ट्र संघाला उपविजेतेपद मिळवून दिले. शाळेच्या मुख्याध्यापिका मृदुला पटेल व वसतिगृह अधीक्षक महेश लाड यांनी या खेलाडूंचे या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे. शाळेचे क्रीडा शिक्षक व शिक्षिका शिक्षक वृंद आदींनी देखील अभिनंदन केले आहे.