पहिली जिल्हास्तरीय रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा २० जूनपासून

  • By admin
  • June 11, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः टेबल टेनिस स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशनतर्फे २० ते २२ जून या कालावधीत पहिल्या जिल्हास्तरीय रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

विभागीय क्रीडा संकुलात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा अंडर ११ मुले-मुली, अंडर १३ मुले-मुली, अंडर १५ मुले-मुली, अंडर १७ मुले-मुली, अंडर १९ मुले-मुली अशा विविध वयोगटांसह पुरुष व महिला या गटात होणार आहे. तसेच ३९ प्लस, ४९ प्लस व ५९ प्लस या गटातही स्पर्धा घेतली जाणार आहे.

या स्पर्धेसाठी प्रत्येकी पाचशे रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. १८ जूनपर्यंत इच्छुक स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी राज जयस्वाल, श्रीपाद जोशी, मनोज कानोडजे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष नीलेश मित्तल व सचिव विक्रम डेकाटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *