
तीन गटात अंतिम फेरीत प्रवेश – बीडच्या समर्थला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान
बीड ः रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि पुणे रग्बी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाराव्या १४ वर्ष आणि १९ वर्ष वयोगटाच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन पुणे येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत बीडच्या मुलांच्या अंडर १४ संघाने अंतिम फेरीत धाराशिव संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले.
श्री शिवछत्रपती क्रीडापीठ महाळुंगे-बालेवाडी पुणे येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बीड जिल्हा रग्बी असोसिएशनच्या १४ वर्ष आणि १९ वर्ष मुले आणि मुली गटाच्या संघाने सहभाग घेतला होता. या राज्यस्तरीय स्पर्धेत बीड १४ वर्ष मुले संघाने प्रतिस्पर्धी संघांना नमवत अंतिम फेरीत प्रवेश केला आणि धाराशिव संघास नमवत दिमाखदारपणे सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने प्रथमच उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार देण्यात आला, हा पुरस्कार बीड जिल्ह्याचा खेळाडू समर्थ डुबे याने प्राप्त केला आहे.
तसेच १४ वर्ष मुली,१९ वर्ष मुले आणि मुली गटातील खेळाडूंनी सर्व प्रतिस्पर्धी संघास नमवत अंतिम सामन्यात प्रवेश केला. मागील काही वर्षांपासून सुवर्ण पदक विजेत्या कोल्हापूर संघाला अंतिम सामन्यात चुरस दिली आणि तिन्ही संघांनी रौप्य पदक प्राप्त केले आहे.
संघातील सर्व खेळाडूंना मोरया क्रीडा मंडळ बीडचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय रग्बी प्रशिक्षक तसेच बीड जिल्हा रग्बी मुख्य प्रशिक्षक नितीन येळवे (8208444836), रग्बी प्रशिक्षक तथा कारागृह पोलीस (बीड) शोएब खाटीक, सचिव अशोक चौरे यांच्या माध्यमातून प्रशिक्षित करण्यात येत आहे.
बीड जिल्हा रग्बी असोसिएशन संघाच्या सुवर्ण आणि रौप्य पदक विजेत्या कामगिरीबद्दल क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे, रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे पदाधिकारी मीनाल पास्ताला, नासेर हुसेन, संदीप मोसमकर, ईश्वर कोटारकी, बीड जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष इसाक शेख, उपाध्यक्ष रमेश सानप, कोषाध्यक्ष हरिभाऊ बांगर, सचिव महेश घुले, कार्याध्यक्ष नितीन येळवे, प्रशिक्षक शोएब खाटीक, प्रशिक्षक अशोक चौरे, भगवानराव बागलाने, शिवराज देवगुडे, साईनाथ राजे (जालना), अदनान शेख आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
चमकदार कामगिरी
१४ वर्षांखालील सुवर्णपदक विजेता संघ – आर्यन येळवे, करण खरसाडे, शर्विल काकड, गजानन हाके, नयन हटकर, संकेत घुबे, धीरज शिंदे, मुळूक अनमोल, रत्नेश्वर पोपळे, शौर्य नवले.
,
१४ वर्ष मुलींचा रौप्य पदक विजेता संघ – नंदिनी मुळूक, अक्षरा चौरे, घोडके सिद्धी, मांडवे श्रृती, टेकडे सई, ठाकरे प्रीती, हांडगे पूजा, धांडे सिद्धी, घोडके वेदिका, माने सानवी, आहेर श्रावणी, पवार सार्थक, शिंदे हर्षवर्धन.
१९ वर्षांखालील रौप्यपदक विजेता मुलांचा संघ – यश जाधव, सुरज येडे, सूरज येवले, आकाश खांडे, ईश्वर कानडे, ओंकार मोरे, ऋषभ शिंदे, वेदांत डावकर, भागेश पाटील, शिंगटे प्रतीक, मुंढे सुमित, साळवे गौरव, ओम आहेर.
१९ वर्षांखालील रौप्यपदक विजेता मुलींचा संघ – आदिती लोंढे, किर्ती जाधव, दिवे राधा, दीपाली ताटे, शिवानी शेळके, ज्ञानेश्वरी निकस, अमृता अंभोरे, पल्लवी भोसले, प्रियांका काळे, सायली तांदळे, भाग्यश्री काळे, ऋतिका राऊत.