
साई पूजा ट्रॉफी शॉप, रोलर रिले स्केटिंग संघटनेतर्फे आयोजन
छत्रपती संभाजीनगर ः उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेताना आणि एक अनोखा अनुभव देण्यासाठी साई पूजा ट्रॉफी शॉप, रोलर रिले स्केटिंग असोसिएशन छत्रपती संभाजीनगर आणि अंबे स्केटिंग अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल येथे महाराष्ट्रातील पहिली आंबा खाण्याची स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत ५०-६० स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आंबा खाण्याचा आनंद लुटला.
छत्रपती संभाजीनगरात पार पडलेल्या या आगळ्या-वेगळ्या स्पर्धेमध्ये सर्व सहभागी स्पर्धकांना स्मृतीचिन्ह पदक व ट्रॉफी देण्यात आली. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना बेस्ट मँगो बॉय समर्थ पेंढारकर व बेस्ट मँगो गर्ल गुंजन झवर यांना ट्रॅकसूट देण्यात आला.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन अंबे स्केटिंग अकॅडमीचे संस्थापक व सचिव भिकन अंबे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. ही स्पर्धा त्यांच्या कल्पकतेचा आणि नेतृत्वगुणांचा उत्तम नमुना ठरली.
या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे राजेश पवार, आयोजक भिकन अंबे, रफिक जमादार, संदीप साखरे, अरुण पाईकडे, राधिका अंबे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सुंदर आणि आनंददायक स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी साई अंबे, पूजा अंबे, तेजस सोनाळकर, सुनील पाटील यांनी विशेष सहकार्य केले. ही अनोखी आंबा खाण्याची स्पर्धा केवळ स्पर्धा नव्हती, तर ती एक सामाजिक सणासारखी भरगच्च ऊर्जा देणारी उपक्रम ठरली, ज्यात कुटुंब, मित्रपरिवार, आणि खेळाडूंनी एकत्र येऊन गोड आठवणी निर्माण केल्या.
विजेते स्पर्धक
१० वर्षे मुले ः १. यश गोरे, २. राजवीर रांजणगावकर, ३. समर्थ पेंढारकर, ४. रुद्रांश शिंदे, ५. देवांश शिंदे.
१० वर्षे मुली ः १. युक्ता लांडगे.
२० वर्षे मुले ः १. अद्वैत साळवे, २. विराट कर्णाळे, ३. आयुष अंकुशकर.
२० वर्षे मुली ः अक्षरा काकडे , आरोही खेडकर.
३० वर्षे मुली ः १. दिव्या हांकर.
४० वर्षे पुरुष गट ः १. सुनील पेंढारकर, २. प्रमोद राऊत.
४० वर्षे महिला गट ः १. शामल झवर, २. वैशाली अंकुशकर, ३. कल्याणी खेडकर, ४. अमृता काकडे, ५. अंजली देशपांडे, ६. सारिका जाधव.
५० वर्षे गट ः १. विक्रम काकडे.
६० वर्षे गट ः १. मोहन सोनवणे, २. आदिनाथ खेडकर, ३. सीताराम मुळे.