यवतमाळच्या कराटे स्पोर्ट्स अकादमीच्या सात खेळाडूंची निवड 

  • By admin
  • June 11, 2025
  • 0
  • 47 Views
Spread the love

उदयपूर येथे राष्ट्रीय कराटे स्पर्धा 

यवतमाळ ः यवतमाळ येथील कराटे स्पोर्ट्स अकादमीच्या सात खेळाडूंची राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

कराटे इंडिया ऑर्गनायझेशन, वर्ल्ड कराटे फेडरेशन, एशियन कराटे फेडरेशन, कॉमनवेल्थ कराटे फेडरेशन, साउथ एशियन कराटे फेडरेशन  व इंटरनॅशनल कराटे फेडरेशन द्वारे मान्यता प्राप्त वर्साटाइल शोतोकान कराटे फाउंडेशन ऑफ इंडिया व केव्हीएस कराटे अकादमीतर्फे तिसरी मेवार कप, राष्ट्रीय कराटे स्पर्धा उदयपूर, राजस्थान येथे २९ ते ३० जून दरम्यान होणार आहे.

या राष्ट्रीय स्पर्धेकरिता विदर्भ राज्यातून कराटे स्पोर्ट्स अकादमी यवतमाळच्या सात विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये यश मंटू प्रसाद, शौर्य संदीपसिंग बिसेन, अक्षरा अंकुश खडसे, त्रिशा मंटू प्रसाद, रिद्धी मंटू प्रसाद, आराध्या दीपक हो, दिव्या दीपक हो या खेळाडूंचा समावेश आहे. 

हे सर्व विद्यार्थी आणि प्रशिक्षक सुजीत पत्रे २७ जून रोजी या राष्ट्रीय स्पर्धेकरिता रवाना होणार आहे. वर्साटाइल शोतोकान कराटे फाऊंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व कराटे इंडिया ऑर्गनायझेशन कमिटीचे स्पर्धा सदस्य राष्ट्रीय पंच वीर चव्हाण, स्काय इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र डांगे, संचालक यशवंत डांगे, मुख्याध्यापक कृष्णा कुमार यांनी सर्व विद्यार्थ्याचे कौतुक करून २९ जून रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता शुभेच्या दिल्या.

विद्यार्थ्यांचा सराव कराटे स्पोर्ट्स अकादमी यवतमाळ येथे सुजीत पत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कराटे स्पोर्ट्स अकादमीचे संस्थापक अध्यक्ष व विदर्भ शोतोकान कराटे असोसिएशन, विदर्भ राज्य, सचिव व राष्ट्रीय कराटे प्रशिक्षक सुजित पत्रे, कराटे स्पोर्ट्स अकादमी, यवतमाळच्या सचिव महिला प्रशिक्षक आरती पत्रे, स्नेहल बोरकर, विदर्भ शोतोकान कराटे असोसिएशनचे सहसचिव आशुतोष अढाळ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून उदयपूर (राजस्थान) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांना शुभेच्या दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *