
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा किक बॉक्सिंग संघटनेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत समृद्धी भगुरे, राघव मरसकोल्हे, प्रतीक्षा पचलोरे, पायल शिंदे, कृष्णा जंगले, प्रणव बनकर यांनी आपापल्या वयोगटात विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत विविध गटात ७८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
गरवारे कम्युनिटी सेंटर येथे जिल्ह्यस्तरिय किक बॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगरचे इंडियन आर्मीचेचे हवालदार शशिकांत सुडके, वाकोचे आंतरराष्ट्रीय पंच व अधिकारी छत्रपती संभाजीनगर जिल्हा व शहर संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश मिरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेत पंच व अधिकारी म्हणून प्रथमेश राजपूत, सुमित जाधव, प्रफुल दांडगे, पायल शिंदे, सुमित तोडकर यांनी काम पाहिले.
या स्पर्धेतील विजयी खेळाडूंची २६ ते २९ जून दरम्यान पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी जिल्हा संघात करण्यात आली आहे. विजयी खेळाडूंचे इंडियन आर्मीचे लेफ्टनंट कर्नल सुजित कुमार, गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतावणे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा व शहर किकबॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश मिरकर सचिव अनिल मिरकर यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू
सुवर्ण पदक ः समृद्धी भगुरे, प्रतीक्षा पचलोरे, रुही अग्रवालल, अदिती यादव, आरोही सुरडकर, पायल शिंदे, प्रांजली ढाकणे, आचल यादव, आराध्या पाटील, सिद्धी भडंगे, श्रुती टोणगिरे, राघव मरसकोल्हे, श्रेयस यादव, हर्षवर्धन वैरागड, आदित्य यादव, वेदांत वाघमोडे, स्वराज कदम, सर्वेश लढे, रागव सुरडकर, जीवन वाघमारे, वेदांत टाले, नीवेश पाटील, शुभम साठे, सोहम राठोड, कृष्णा जंगले, प्रणव बनकर, धीरज डागर, छोटू राम.
रौप्य पदक ः उर्जा निकम, आरोही मोरे, प्रांजली ढाकणे, कर्मन्य पाटील, चैतन्य इंगळे, सर्वेश लढे, वेदांत टाले, नीवेश पाटील, अंशुमन प्रसाद, सोहम राठोड, धीरज डागर, छोटू राम.
कांस्य पदक ः आरोही मोरे, आरोही सुरडकर, आचल यादव, आराध्या पाटील, चैतन्य इंगळे, श्रेयस यादव, वेदांत वाघमोडे, स्वराज कदम, राघव सुरडकर, शुभम साठे, अंशुमन प्रसाद, अजिंक्य भंदारगे,