क्रीडा आयुक्तांना महाराष्ट्र युवा क्रीडा संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन

  • By admin
  • June 11, 2025
  • 0
  • 76 Views
Spread the love

पुणे ः महाराष्ट्र युवा क्रीडा संघटनेकडून विविध क्रीडा विषयक मागणींसाठी क्रीडा विभागाच्या नूतन क्रीडा आयुक्त शितल तेली उगले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र युवा क्रीडा संघटनेच्या वतीने अनेक वर्षे प्रलंबित असणारे विषय म्हणजे क्रीडा आरक्षण, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू थेट नियुक्तीचा विषय मंत्रालयात प्रलंबित आहे. या विषयांचा पाठपुरावा करावा आणि ज्या प्रमाणे केंद्रात खेलो इंडिया आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना आरक्षण दिले जाते त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात देखील खेलो इंडिया आंतर विद्यापीठ स्पर्धेतील खेळाडूंना आरक्षण द्यावे या मागणीचे निवेदन क्रीडा आयुक्तांना देण्यात आले. त्यानंतर या विषयावर चर्चा झाली.

या प्रसंगी क्रीडा आयुक्त म्हणून नियुक्त झाल्याबद्दल शीतल तेली उगले यांचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त सागर मगरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या प्रसंगी श्रेयश तांबेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *