
ऑस्ट्रेलिया सर्वबाद २१२; दक्षिण आफ्रिका चार बाद ४३
लंडन : जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलचा पहिला दिवस वेगवान गोलंदाजांनी गाजवला. कागिसो रबाडा याने पाच विकेट घेत गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव अवघ्या २१२ धावांत गुंडाळला. त्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिका संघाने २२ षटकात चार बाद ४३ धावा काढल्या आहेत. आफ्रिका संघ अद्याप १६९ धावांनी पिछाडीवर आहे.

ऑस्ट्रेलिया संघाला २१२ धावांवर रोखल्याचा आनंद दक्षिण आफ्रिका संघाला फारकाळ घेता आला नाही. मिचेल स्टार्क (२-१०), हेझलवूड (१-१०), कमिन्स (१-१४) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर आफ्रिका संघाने २२ षटकांच्या खेळात चार फलंदाज केवळ ४३ धावांत गमावले आहेत.
तत्पूर्वी, कागिसो रबाडाच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची दाणादाण उडाली. रबाडा आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ५ बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या अष्टपैलू ब्यू वेबस्टरने ७२ धावा केल्या.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात खूपच खराब झाली कारण ६७ धावांच्या अंतराने ४ बळी पडले. उस्मान ख्वाजा खातेही उघडू शकला नाही, तर ट्रॅव्हिस हेड अवघ्या ११ धावा काढून बाद झाला. स्टीव्ह स्मिथ आणि ब्यू वेबस्टरने ७९ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला संकटातून वाचवले. ६६ धावा करून स्टीव्ह स्मिथ बाद झाला.
अॅलेक्स कॅरीने २३ धावांचे योगदा दिले. मोठ्या डावात रूपांतर करू शकला नाही. अष्टपैलू खेळाडू ब्यू वेबस्टर एका मजबूत खडकासारखा क्रीजवर उभा राहिला, पण ७२ धावांवर बाद झाला. एकेकाळी ऑस्ट्रेलियाने ५ विकेट गमावत १९२ धावा केल्या होत्या, पण पुढच्या २० धावांत ऑस्ट्रेलियाने शेवटचे पाच विकेट गमावले.
कागिसो रबाडाचा कहर
कागिसो रबाडाने उस्मान ख्वाजाला शून्य धावांवर बाद करून ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. रबाडाने सलग एकामागून एक विकेट घेत दक्षिण आफ्रिकेचे ५ विकेट घेतले, त्यापैकी त्याने २ क्लिन बोल्ड केले. रबाडा याने उस्मान ख्वाजा, कॅमेरॉन ग्रीन, ब्यू वेबस्टर, पॅट कमिन्स आणि मिशेल स्टार्क यांचे विकेट घेतले. त्याच्याशिवाय मार्को जॅनसेननेही त्याच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर ३ विकेट घेतल्या. त्याच वेळी, एडेन मार्कराम आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
स्मिथ अव्वल स्थानावर
अनुभवी स्टीव्ह स्मिथ ५१ धावा काढताच लॉर्ड्सवर सर्वाधिक कसोटी धावा करणारा परदेशी फलंदाज बनला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या वॉरेन बार्डस्लीचा मोठा विक्रम मोडला. वॉरेन बार्डस्लीने १९०९ ते १९२६ दरम्यान लॉर्ड्सवर ५ कसोटी सामन्यांच्या ७ डावात २ शतके आणि २ अर्धशतकांच्या मदतीने ५७५ धावा केल्या. आता स्मिथच्या लॉर्ड्सवर ५९१ धावा आहेत. त्याने येथे २ शतके आणि ३ अर्धशतके केली आहेत.
डब्ल्यूटीसी फायनलच्या पहिल्या डावात अर्धशतकादरम्यान, स्मिथने महान डॉन ब्रॅडमन आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज गॅरी सोबर्स यांनाही मागे टाकले आहे. ब्रॅडमनने लॉर्ड्सवर ४ कसोटी सामन्यांच्या ८ डावात ५५१ धावा केल्या होत्या. त्याच वेळी, गॅरी सोबर्सने ५ कसोटी सामन्यांच्या ९ डावात ५७१ धावा करण्याचा पराक्रम केला होता. आता स्मिथ लॉर्ड्सवर कसोटीत ६०० धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनू शकतो.
अॅलन बॉर्डर आणि व्हिव्हियन रिचर्ड्सनाही मागे टाकले
इंग्लंडच्या भूमीवर कसोटीत सर्वाधिक ५०+ धावा करणारा स्टीव्ह स्मिथ हा फलंदाजही बनला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या अॅलन बॉर्डर आणि व्हिव्हियन रिचर्ड्सचा विक्रम मोडला. अॅलन बॉर्डरने इंग्लंडमध्ये २५ कसोटी सामन्यांमध्ये १७ वेळा पन्नासपेक्षा जास्त धावा केल्या होत्या. दुसरीकडे, व्हिव्हियन रिचर्ड्सने २४ कसोटी सामन्यांमध्ये हा पराक्रम केला होता. पण आता स्मिथने इंग्लंडमध्ये १८ अर्धशतकांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने फक्त २३ कसोटी सामन्यांमध्ये हा पराक्रम केला आहे.
‘फायनल’मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
नाथन लायन – २१०
पॅट कमिन्स – २००
आर. अश्विन – १९१
पॅट कमिन्स – १७२
जसप्रीत बुमराह – १५६
कागिसो रबाडा – १५६